नगरसेवकांच्या नातेवाइकांची लुडबूड आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली !

Foto


छत्रपती संभाजीनगर, - (सांजवार्ता ब्युरो): महापालिकेच्या - कारभारात नगरसेवकांचे पती, - पत्नी, मुलगा किंवा नातेवाइकांचा हस्तक्षेप सहन केला जाणार - नाही, असा कडक इशारा देत - पालिका आयुक्तांनी तसे अधिकृत - पत्रच जारी केले होते. मात्र, - प्रशासनाच्या या आदेशाला - लोकप्रतिनिधींनी पुन्हा एकदा - केराची टोपली दाखवल्याचे समोर - आले आहे. शुक्रवारी आयोजित - करण्यात आलेल्या प्रभाग चारच्या बैठकीत काही नगरसेवकांचे - पती आणि त्यांचे खाजगी - पीए बिनदिक्कतपणे उपस्थित - राहिल्याचे पाहायला मिळाले. या - अनधिकृत हस्तक्षेपामुळे बैठकीला - उपस्थित असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. आयुक्तांच्या कडक इशाऱ्यानंतरही
-
नगरसेवकांच्या नातेवाइकांची ही मनमानी कायम असल्याने, आता महापालिका प्रशासन यावर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
महापालिकेच्या कारभारात नगरसेवकांचे पती, पत्नी, मुलगा व इतर नातेवाइकांचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असे पत्र पालिका आयुक्तांनी काढले होते. शुक्रवारी प्रभाग चारची चारची बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी तेथील काही नगरसेवकांचे पती आणि त्यांचे पीए हेही उपस्थित असल्याचे समोर आले. त्यामुळे बैठकीसाठी आलेल्या महापालिका अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर आता महापालिका प्रशासन काय कारवाई करणार याची चर्चा सुरू झाली आहे. काही ठिकाणी महापालिका कार्यालयात येऊन
अधिकाऱ्यांनाही प्रश्न विचारले !
▶ प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी प्रभाग चारची बैठक घेण्यात आली. सभापती जीवकपाल हिवराळे अध्यक्षस्थानी होते. याठिकाणी काही नगरसेविकांचे पती तर काहींचे पीए सहभागी झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यातही ही मंडळी आघाडीवर होती. आयुक्तांचे आदेश असतानाही हा प्रकार घडल्याबद्दल अधिकारी आश्चर्यचकित झाले. आता यावर आयुक्त काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
कामकाज सुरू असताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे, त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकाऱ्यांना दमदाटी करण्याचे प्रकार घडले होते.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions